नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : धडगाव तालुक्यातून एक कोटी 15 हजारांचा ओला गांजा जप्त


नंदुरबार (बुधवार, 7 ऑक्टोबर 2026) : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने धडगाव तालुक्यात मोठी कारवाई करत एक कोटी 15 लाख रुपये किंमतीची 262 किलो वजनाची ओल्या गांजाची झाडे जप्त केली. या कारवाईने पुन्हा एकदा गांजा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धडगाव पोलीस ठाणे हद्दीतील मांढवी गावाच्या शिवारातील रुणमालपाडा येथे एका शेतकर्‍याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करून त्याची जोपासना केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने मांढवी गावाच्या शेतशिवारातील वनपट्ट्यामध्ये मंगळवार, 6 रोजी पाहणी केली असता 262 किलो वजनाची गांजाची झाडे आढळून आली. या गांजाची अंदाजे किंमत एक कोटी 15 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी पिंटू उर्फ पिंट्या मिट्या पटले (रा.मांडवी बु.॥, रुणमालपाडा, जि.नंदुरबार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोरसावी, मुकेश तावडे, सुनील येवले, सचिन वसावे, मनोज महाजन, अभय राजपूत, निशीगंध गवळे, हेमंत बारी, विनोद पाटील, राहुल पाटकर आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !