कोळवदच्या 30 वर्षीय तरुणाचा जळगाव रुग्णालयात चक्कर येऊन कोसळल्याने मृत्यू


यावल (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील कोळवद गावातील गंगापूर भागातील रहिवासी 30 वर्षीय तरुण हा जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर त्याने उपचार घेतले मात्र तो बाहेर पडत् असताना त्याला चक्कर आल्याने तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडला. त्याला तातडीने पुन्हा रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गौतम धर्मा भालेराव (30, कोळवद) असे मृताचे नाव आहे.

यावल पोलिसात नोंद
कोळवद, ता.यावल येथील गंगापूर परिसरातील गौतम धर्मा भालेराव (30) हा तरुण 21 ऑक्टोबर रोजी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी गेला असता त्या ठिकाणी डॉक्टरांकडून त्याने तपासणी करून घेतल्यानंतर औषध घेतले. नंतर तो ओपीडीच्या बाहेर जाऊ लागल्यनंतर अचानक त्याला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला पुन्हा उपचारांकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ.निखील तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ही नोंद यावल पोलिसात वर्ग करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !