पिंपरूड गावातील प्रौढाने उचलले टोकाचे पाऊल
यावल (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील पिंपरूड गावातील 50 वर्षीय प्रौढाने घरातील पत्री शेडच्या लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
पिंपरूड गावातील बाळू अशोक सुरवाडे (50) हे आपल्या घरी असतान त्यांनी आपल्या घरातील पत्री शेडच्या लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार कुटुंब आणि नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांना तेथून काढून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप बडगे करीत आहे.



