सांगवी बुद्रुक गावातून विवाहितेसह दोन बालकांचे अपहरण
यावल (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावातून एका 24 वर्षीय विवाहिता तिचा बारा वर्षीय मुलगा आणि दहा वर्षीय मुलगी असे तिघांचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून त्यांना पळवून नेत अपहरण केले आहे. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे अपहरण प्रकरण
सांगवी बुद्रुक गावातील 24 वर्षीय विवाहिता त्यांचा 12 वर्षीय मुलगा तसेच 10 वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेते अपहरण केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रारंभी त्यांचा शोध घेण्यात आला मात्र हे तिघे कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे.



