भुसावळ नगरपालिकेचे संकीर्ण विभागप्रमुख वैभव पवार यांचे अपघाती निधन


भुसावळ (शनिवार, 31 ऑक्टोबर 2026) : भुसावळ नगरपालिकेचे संकीर्ण विभागप्रमुख वैभव सुरेश पवार (32) यांचे शनिवारी मध्यरात्री कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात पवार यांच्या लहान भगिनीदेखील गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मयत वैभव पवार यांची अंत्ययात्रा शिवपूर कन्हाळा रोड व्हीआयपी कॉलनी भागातून शनिवारी दुपारी एक ते दिड वाजेदरम्यान निघणार आहे.

कार अपघातात निधन
भुसावळ पालिकेतील संकीर्ण विभागप्रमुख वैभव सुरेश पवार (32) हे कारद्वारे भगिनीसोबत शनिवारी मध्यरात्री प्रवासात असताना त्यांची कार (एम.एच.19 ई.पी.3222) झाडावर धडकल्याने अपघात घडला व या अपघातात वैभव यांचे जागीच निधन झाले तर त्यांच्या भगिनी जखमी झाल्या.

दोन दिवसांपूर्वीच मुलीचा वाढदिवस केला साजरा
पालिकेत कार्यरत असलेले वैभव पवार यांचा स्वभाव हसतमुख व सर्वांशी मिळून मिसळून असल्याने त्यांचा सर्वत्र नावलौकीक होता. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्यांचा आरु नामक चार वर्षीय मुलीचा वाढदिवसही साजरा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !