रेल्वे प्रवाशांना दिवाळीत दिलासा : या मार्गावर धावणार ‘अतिरिक्त दिवाळी विशेष गाड्या’


भुसावळ (मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026) : दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे

नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष गाडी (8 सेवा)
गाडी क्रमांक 01083 लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक 6.11.2026, दिनांक 8.11.2026, दिनांक 11.11.2026 आणि दिनांक 13.11.2026 रोजी 17.05 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 07.00 वाजता पोहोचेल.









गाडी क्रमांक 01084 नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी, नागपूर येथून दिनांक 5.11.2026, दिनांक 7.11.2026, दिनांक 10.11.2026 आणि दिनांक 12.11.2026 रोजी 13.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 06.15 वाजता पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी (4 सेवा)
गाडी क्रमांक 01085 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 7 नोव्हेंबर आणि दिनांक 9 नोव्हेंबर रोजी 3.25 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसर्‍या दिवशी सात वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01086 नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी, नागपूर येथून दिनांक 08.11.2026 आणि दिनांक 10.11.2026 रोजी 13.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी .25 वाजता पोहोचेल. या गाडीला ादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !