धनतेरसला पोलिसाकडून मागितली ‘धनाची लाच’ : धुळ्यातील हिरे महाविद्यालयातील स्टेनोसह दोघे एसीबीच्या जाळ्यात


धुळे (शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026) : सर्वत्र दिवाळीचा उत्साह असून शुक्रवारी धनतेरस असल्याने सर्वत्र धनाचे पूजन सुरू असताना धुळ्यात मात्र सणालाच पोलिसाकडून लाच मागणे धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्टेनोच्या अंगलट आले. खाजगी पंटरामार्फत दहा हजारांची लाच घेताच धुळ्यातील एसीबीने आरोपींच्या मुसक्या बांधताच धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. सुदेश दामोधर मानकर, असे अटकेतील स्टेनोचे तर श्रीराम शंकर पाटील उर्फ दादू मोरे (मोहाडी, ता.धुळे) असे खाजगी पंटराचे नाव आहे.

पोलिसाकडून स्वीकारली लाच
खास सूत्रानुसार, तक्रारदार हे धुळे पोलीस दलातील कर्मचारी आहेत. ते दीर्घकाळ रजेवर असल्याने पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी त्यांना वैद्यकीय समितीचे प्रमाणपत्र आवश्यक होते व संबंधित कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर काम करून देण्यासाठी 15 हजार रुपयांची मागणी खाजगी पंटर श्रीराम पाटीलने केली व लागलीच कामासाठी पाच हजार रुपये स्वीकारले. मानकर यांचा फोन आल्यानंतर त्यांना भेटून दहा हजारांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने 5 रोजी धुळे एसीबीकडे या संदर्भात नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली.









कक्षात स्वीकारली लाच
शुक्रवारी सायंकाळी एसीबीने सापळा रचला. दहा हजारांची लाच अधिष्ठातांच्या कार्यालयातील कक्षात सुदेश मानकर यांनी स्वीकारताच धुळे एसीबीने आरोपीच्या मुसक्या बांधल्या तर नंतर खाजगी पंटरालाही अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, सहाय्यक फौजदार राजन कदम, पोलीस हवालदार मुकेश अहिरे, मकरंद पाटील, रामदास बारेला यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !