जळगाव जिल्हा बँक निवडणूक : माघारीनंतर 12 जागा बिनविरोध

आठ मतदारसंघातील नऊ जागांसाठी आता होणार निवडणूक ; दिग्गजही रिंगणात


जळगाव (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या सन 2026 ते 2031 या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवसानंतर निवडणूक रिंगणातील अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. माघारीनंतर तब्बल 12 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. या जागांवरही महायुतीतील घटक पक्षांचे वर्चस्व स्पष्ट आहे. उर्वरित आठ मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार असून तेथील अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी जारी केली आहे.

बिनविरोध निवडून आलेले पक्षनिहाय 12 उमेदवार असे

शिवसेना : सहा जागा बिनविरोध
गुलाबराव पाटील- धरणगाव विकासो
चंद्रकांत सोनवणे- एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्ग
सुमित पाटील- पाचोरा विकासो प्रवर्ग
सोमसिंग खुमानसिंग पाटील- भडगाव विकासो
मृणाल अमोल पाटील- एरंडोल विकासो
नलिनी चिमणराव पाटील- पारोळा विकासो

भाजपा : चार जागा बिनविरोध
गिरीश दत्तात्रय महाजन- जामनेर विकासो
रजनी संजय सावकारे- भुसावळ विकासो
रोहित दिलीप निकम- चोपडा विकासो
मधुकर रामचंद्र राणे- बोदवड विकासो

राष्ट्रवादी काँग्रेस : दोन जागा बिनविरोध
जयश्री अनिल पाटील- अमळनेर विकासो
सोनल संजय पवार- धरणगाव विकासो

आठ मतदारसंघांतून नऊ जागांसाठी होणार थेट लढत

मुक्ताईनगर तालुका (विकासो प्रतिनिधी)
रक्षा निखिल खडसे
देवयानी चंद्रकांत देशमुख

यावल तालुका (विकासो प्रतिनिधी)
प्रशांत लिलाधर चौधरी
गणेश गिरधर नेहेते
रामदास गोंडू पाटील
विनोदकुमार पंडीतराव पाटील

रावेर तालुका (विकासो प्रतिनिधी)
राजेंद्र पंढरीनाथ चौधरी
योगीराज गबाजी पाटील
रमेश नगराज पाटील

चाळीसगाव तालुका (विकासो प्रतिनिधी)
आमदार मंगेश रमेश चव्हाण
नारायण नथू पाटील
विजय भिकनराव पाटील

महिला प्रतिनिधी मतदारसंघ (एकूण दोन जागा)
माधुरी चंद्रशेखर अत्तरदे
ज्योती नाना पाटील
पुनम प्रशांत पाटील
सुलोचना भगवान पाटील

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी (ओ.बी.सी.)
अनिल वसंत पाटील
सुनील प्रकाश देवरे
कुलभूषण विरभाण पाटील
चंद्रकांत रामधन बाविस्कर

विमुक्त जाती/भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग:
अंबादास मधुकर गोसावी
काशिनाथ देवराम जावरे
सुरेश पुना धनके
मोरसिंग गोपा राठोड
विकास ज्ञानेश्वर वाघ

इतर सहकारी संस्था
खिलचंद सुरेश इंगळे
प्रशांत लिलाधर चौधरी
विशाल गुलाबराव देवकर
विकास उखर्डू नारखेडे


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !