पोरबंदर-सांतरागाछी एक्सप्रेसमध्ये तात्पुरता अतिरिक्त शयनयान श्रेणीचा कोच
भुसावळ (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोरबंदर-सांतरागाछी एक्सप्रेसमध्ये तात्पुरता अतिरिक्त शयनयान श्रेणीचा कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक 12949/12950 पोरबंदर-सांतरागाछी-पोरबंदर एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12949 (पोरबंदर ते सांतरागाछी) गाडीत 20 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 2026 या कालावधीत एक अतिरिक्त शयनयान श्रेणीचा कोच जोडण्यात येणार आहे तर गाडी क्रमांक 12950 (सांतरागाछी ते पोरबंदर) गाडीला 22 नोव्हेंंबर 2026 ते 27 डिसेंबर 2026 या कालावधीत एक अतिरिक्त शयनयान श्रेणीचा कोच जोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या अतिरिक्त सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रवासापूर्वी आपल्या तिकिटाची स्थिती अवश्य तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
