महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण व परिणाम मूल्यांकन
लाभार्थींना सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रतिनिधींना आवश्यक माहिती व सहकार्य करावे : महामंडळाचे आवाहन
जळगाव (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणार्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण व योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना 10 जुलै 1978 रोजी झाली असून, मागासवर्गीय समाजातील घटकांचे सामाजिक व आर्थिक उत्थान करणे, त्यांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उद्देशाने महामंडळामार्फत विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येतात.
या सर्वेक्षणासाठी सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दि. 13 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार च/ी. झीळर्चेींश खपषीर्रीीीींर्लीीींश ऊर्शींशश्रेिाशपीं उेर्पीीश्रींरपीीं र्झीींं. ङींव. या संस्थेची तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्वेक्षणाद्वारे कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची सद्यस्थिती, कर्जाचा विनियोग, सुरू असलेल्या व्यवसायाची प्रगती, रोजगार व उत्पन्नातील वाढ, कर्ज परतफेडीची स्थिती तसेच लाभार्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत झालेला बदल याबाबत माहिती संकलित करण्यात येणार आहे. याशिवाय व्यवसाय करताना येणार्या अडचणी आणि योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील सर्व संबंधित लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येणार्या नियुक्त प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे
