लेवा समाजाच्या विवाहेच्छुकांसाठी भुसावळमध्ये वर-वधू सूची उपलब्ध

29 नोव्हेंबर रोजी जळगाव शहरात वधू-वर मेळाव्यात सहभागाचे आवाहन


भुसावळ (रविवार, दि. 22 नोव्हेंबर 2026) : सकल लेवा पाटील समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी लेवा नवयुवक संघ, जळगाव यांच्या वतीने सन 2026-27 ची वर-वधू परिचय सूची तयार करण्यात आली आहे. या सूचीमध्ये हजारो विवाहेच्छुकांची शैक्षणिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक माहिती छायाचित्रांसह संकलित करण्यात आली असून, समाजातील विवाह जुळविण्याच्या प्रक्रियेला यामुळे मदत होणार आहे.

लेवा नवयुवक संघाने परिश्रमपूर्वक तयार केलेल्या या सूचीमध्ये दोन हजार 511 वरांची माहिती असून त्यामध्ये 125 पुनर्विवाह इच्छुक वरांचा समावेश आहे तर वधू सूचीमध्ये एक हजार 44 मुलींची माहिती असून, त्यामध्ये 91 पुनर्विवाह इच्छुक मुलींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा, राज्य, देश तसेच विदेशातील विवाहेच्छुकांची माहिती या सूचीमध्ये देण्यात आली आहे.

सूचीमध्ये विवाहेच्छुकांचे फोटो, शैक्षणिक पात्रता, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि व्यावसायिक तपशील स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत. तसेच सूचीची छपाई आकर्षक असून बांधणीही मजबूत करण्यात आली आहे.

भुसावळात मिळणार सूची
ही विवाहेच्छुक वर-वधू सूची भुसावळ येथील वांजोळा रोड, लक्ष्मीनगर परिसरातील ‘आपले परिवार सार्वजनिक वाचनालय’ येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. शांताराम पाटील (मो. 9545207050) यांच्याकडेही समाजबांधवांना ही सूची मिळू शकणार आहे. अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद नारायण सरोदे व संचालक मंडळाने दिली.

29 नोव्हेंबरला जळगाव येथे वधू-वर मेळावा
दरम्यान, विवाहेच्छुकांचा मेळावा रविवार, 29 नोव्हेंबर रोजी जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलात सकाळी 10 वाजेपासून आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्यापूर्वी विवाहेच्छुकांनी वर-वधू सूची प्राप्त करून त्यातील माहितीचा अभ्यास करावा त्यामुळे आपल्या अपेक्षा आणि पसंतीनुसार योग्य स्थळ शोधणे अधिक सोयीचे होईल, असे वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी कळविले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !