थोरगव्हाणमधील डी.एस.देशमुख विद्यालयात संविधान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा परीक्षा


थोरगव्हाण, ता.रावेर (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : गावातील डी.एस.देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन तसेच मुंबई येथे झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर अधिकारी व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

विद्यालयात पोस्ट प्रदर्शन
संस्थाध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी विद्यालयाला भेट दिलेल्या संविधानविषयक पोस्टर प्रदर्शन संचाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचे अवलोकन करून भारतीय संविधानाची निर्मिती, त्यातील मूलभूत तत्त्वे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये यांची माहिती जाणून घेतली. टी.आर.चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन के.एम.पाटील यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक डी.के.पाटील, ज्येष्ठ शिक्षक वाय.जे.कुरकुरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

दुपार सत्रात प्रश्नावली परीक्षा
दुपारच्या सत्रात इयत्ता पाचवी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित प्रश्नावली परीक्षा आयोजित करण्यात आली. या परीक्षेत 27 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना टी. आर. चौधरी यांच्या हस्ते त्यांनी जाहीर केलेले 453 रुपयाचे रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. परीक्षेत प्रथम- एकता योगेश कुंभार, द्वितीय- मानसी संदीप काळे, तृतीय- जागृती धनराज पाटील, यावेळी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.

प्रश्नावली परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे परीक्षण मुख्याध्यापक डी. के. पाटील, वाय.जे.कुरकुरे, पी.सी.कचरे, जयश्री चौधरी, एन.बी.चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन एम.के.पाटील यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !