यावल शहरातील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संविवधान दिन उत्साहात


यावल (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : शहरातील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2026 रोजी शालेय स्तरावर संविधान दिन अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.सी.ठाकूर होते.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक एन.डी.भारुडे, एस.बी.चंदनकार, बी.पी.वैद्य, ए.एस.सूर्यवंशी, दीपक पाटील, दीपक जोशी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षक एन.डी.भारुडे यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमात शाळेतील 12 विद्यार्थ्यांनी संविधानाच्या विविध पैलूंवर अत्यंत प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संविधानावरील नाट्यकरणाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. मार्गदर्शनादरम्यान ज्येष्ठ शिक्षक एस.बी.चंदनकार यांनी संविधानाची उद्देशिका तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये याविषयी सखोल माहिती दिली.डॉ.नरेंद्र महाले यांनी भारतीय संविधानातील विविध कलमे आणि त्या कलमांनुसार नागरिकांना प्राप्त झालेल्या नागरी हक्कांचा जबाबदारीने व प्रभावीपणे वापर कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन निता पाटील तर आभार बी.पी.वैद्य यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !