रावेरात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली कोविड सेंटरची पाहणी


रावेर : रावेर तालुक्यात लॉकडाऊनची आवश्यकता नसून कोरोना सध्या नियंत्रणात असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील समाधाकारक असून कोविड सेंटरवरदेखील चांगली सुविधा मिळत आहे. नागरीकांनीदेखील सर्दी, खोकला तापाची लक्षणे जाणवल्यास तत्काळ कोविड सेंटरला तपासुन घ्या, कोरोना बाबत तालुक्यात सर्व ऑल इज वेल असल्याचे संकेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रावेरात दिले. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे बुधवारी रावेर तालुक्याच्या दौर्‍यावर होते.

रुग्णांनी घाबरू नये : जिल्हाधिकारी
पत्रकारांशी बोलताना पुढे ते म्हणाले की, रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटरचा लाभदेखील रुग्णांना मिळणार आहे. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत साडे सात हजार लोक कोरोना व्हायरसपासून बरे झाले असून त्यांना डिस्जार्च मिळाला आहे. कोणत्याही रुग्णांनी घाबरू नये, असे आवाहनदेखील जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी या ठिकाणी दिल्या भेट
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सावदा येथे कंटेमेंट झोन, विवरे खुर्द तसेच रावेर कोविड सेंटरची पाहणी केली तसेच रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटरची पाहणी केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन, नगर पालिकेत रवींद्र लांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक आदी उपस्थित होते.

मका खरेदीला मुदतवाढ करण्याचे जिल्हाधिकार्‍यांकडून संकेत
तालुक्यात मक्याचे उत्पादन बघता खरेदी करण्याची तारीख वाढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून बंद असलेले कापुस खरेदी केंद्रांबाबतदेखील माहिती घेऊन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार तसेच कापुस खरेदीबाबत जिनिंगच्या असलेली तांत्रिक बाबी सोडवणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्याने कापूस तसेच मका उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

अशी आहे कोरोनाबाधितांची अपडेट
रावेर तालुक्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण 696 असून यापैकी 493 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर 45 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !