चुंचाळेत नवविवाहितेची आत्महत्या


यावल : आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चुंचाळे येथे घडली. राजश्री अमृत पाटील (20) असे मृत तरुणीचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !