कनकपुरा ते रोयापुरम दरम्यान विशेष पार्सल गाड़ी


भुसावळ : रेल प्रशासनाद्वारा आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाडी चालवण्यात येणार आहे. ज्या लोकांना किंवा व्यावसायीकांना जी काही साधन सामुग्री पाठवयाची असेल त्यांनी आपल्या जवळच्या स्टेशनवर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दर शुक्रवारी सुटणार गाडी
डाऊन 00971 कनकपुरा ते रोयापुरम ही गाडी दिनांक 31 जुलै पासून दर शुक्रवारी 12.40 वाजता प्रस्थान करेल तसेच सोमवार 12.40 वाजता रोयापुरम पोहचेल. या गाडीला भुसावळ, अकोला, नांदेड, निजामाबाद, सिकंदराबाद, रायचूर, गुंटकल, धर्मावरम, बेंगलूर या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 00972 रोयापुरम ते कनकपुरा ही गाडी 4 ऑगस्टपासून दर मंगळवारी 2.30 वाजता प्रस्थान करेल आणि गुरुवारी ला 5.10 वाजता कनकपुरा पोहोचेल. या गाडीला अकोला, भुसावळ, नंदुरबार, उधना, भरूच, वडोदरा, रतलाम, चित्तोडगढ, भीलवाडा, अजमेरला थांबा देण्यात आला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !