गुरांची अवैध वाहतूक : सात जणांविरुद्ध गुन्हा


रावेर : गुरांची अवैधरीत्या वाहतूक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तसेच गुरांची सुटका करण्यात आली. गुरुवारी पहाटे महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर ही कारवाई करण्यात आली.

वाहन तपासणीत उघड झाली बाब
आंतरराज्यीय सीमेवरील तपासणी नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना पांढर्‍या रंगाची महिंद्रा कंपनीची पीक अप (एम.पी.12 जी.ए.1910) ची तपासणी करीत असताना यात गुरे कोंबून भरल्याचे आढळले. वाहनात काळ्या रंगाच्या म्हशी व एक गावरान म्हैस व तीन मुन्हा जातीचे पाडे (हेले) आढळले तर याच गाडीच्या मागून आलेल्या आयशर वाहन (एम.पी.09 जी.एच.1537) या वाहनात मुन्हा जातीचे काळ्या रंगाच्या 13 म्हशी व 07 पाडे (हेले) गुरे आढळली. या प्रकरणी ओमप्रकाश नवलसिंग गोलकर (रा.आरुद, ता.पंधाना, जि.खंडवा), शेख फिरोज शेख मजीद (खंडवा, विमलीपुरा), सादीक शाह हकीम शाह (झोकर, ता.मकसीद, जि.शाजापुर म.प्र.), रईस सईद कुरेशी (आष्टा, जि.सिहोर, म.प्र.), नासीर समी कुरेशी (आष्टा, जि.सिहोर, म.प्र.), साहिद रईस मनसुरी (आष्टा, जि.सिहोर, म.प्र.) सोहेल मिन्नत कुरेशी (झोकर, ता.मकसीद, जि.शाजापुर) या आरोपींविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून महेंद्रा पीकअप व्हॅन व आयशर गाडी जप्त करण्यात आली. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास निलेश चौधरी हे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !