एस.टी.बसेससाठी भारीपाचे डफजी बजाओ आंदोलन


भुसावळसह मुक्ताईनगरात एस.टी.आगार व्यवस्थापकांना डफ वाजवून दिले आंदोलकांनी निवेदन

भुसावळ : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह एस.टी.बसेस सुरू कराव्यात या मागणीसाठी भारीप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीतर्फे भुसावळसह मुक्ताईनगरात एस.टी.प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मागणी मान्य होण्यासाठी डफ वाजवून आंदोलन करूनही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. लॉकडाऊनमुळे ऑफिस, दुकाने, हॉटेल्स, मार्केट बंद ठेवण्यात आल्याने गोरगरीबांचे मोठ्या प्रमाणावर हाल होवून अनेकांचा रोजगारही हिरावला गेल्याने अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकटी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

भुसावळात डफ वाजवून वेधले लक्ष
भुसावळ- भुसावळ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वात डफ वाजवून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली एस.टी. बस सेवा तातडीने सुरू न केल्यास वंचित बहुजन आघाडी च्यावतीने व्यापक स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी दिला. स्थानिक आगार प्रशासनाचे व्यवस्थापक चौधरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

लॉकडाऊनने हिरावला रोजगार
जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले की, कोरोना महामारीचे संकट व त्यातच लादण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमलडी आहे. बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार यांच्यासह, चहावाला, रीक्षावाला, फळे व भाजी विक्रेता, फेरीवाला अशा छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांची उपासमार होत आहे. अशा परीस्थितीत राज्य परीवहन महामंडळाची बस सेवा पूर्ववत सुरू होण ेगरजेचे असून इतरही सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीतपणे सुरू होणे गरजेचे आहे. डफली बजाव आंदोलनप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना सोनवणे, युवा जिल्हा सचिव विद्यासागर खरात, भुसावळ तालुका महासचिव पल्ला घारू आदींची उपस्थिती होती.

मुक्ताईनगरात दफ वाजवून एस.टी.प्रशासनाला दिले निवेदन
मुक्ताईनगर- राज्यभरात बंद असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच गरीबांची लालपरी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी मुक्ताईनगरात भारीप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली. याप्रसंगी डफ वाजवून प्रशासनाला निवेदन भारीपा जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.विनोद एस. इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आगार व्यवस्थापक नाईक यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
आंदोलनत भिकाजी आसलकर, रामदास इंगळे, वसंत लहासे, रमेश वानखेडे, आर.के.बोदडे, माणिक इंगळे, किरण सावकारे, सुरज सोनार, शैलेश वानखेडे, अमर बोदडे, आकाश इंगळे, विक्की सुरवाडे, गोकुळ बोदडे, अमर रोठे, राजू बोदडे, संतोष बोरसे, राहुल इंगळे, बाळू इंगळे, दीपेश वानखेडे, वसीम मंसुरी तसेच बोदवड येथील तालुकाध्यक्ष सुपडा निकम, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख सलीम पटेल, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरडकर, नागसेन सुरडकर, जितेंद्र सूर्यवंशी, किशोर निकम, निलेश सूर्यवंशी, सुभाष इंगळे, अनिल गुरचळ, मुकुंदराव गुरचळ, अमोल घोटगरे, रवी सोनवणे आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !