चौघा भावंडांच्या हत्याकांडाने रावेर तालुका हादरला
दोघा भावांसह बहिणीची कुर्हाडीचे घाव घालून हत्या : बोरखेडा रस्त्यावरील शेत-शिवारातील घटना
रावेर : शेतात मध्यरात्री झोपलेल्या चौघा भावंडाची कुर्हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आल्याची (Borkheda Hatyakand) घटना शुक्रवारी मध्यरात्री रावेर तालुक्यातील बोरखेडा (Borkheda) रस्त्यावरील शेत-शिवारात ही घटना घडली. मृतांमध्ये दोघा भावंडासह दोघा बहिणींचा समावेश आहे. ही हत्या नेमकी कुणी वा कोणत्या उद्देशाने केली? याची ठोस माहिती अद्याप कळू शकलेली नाही.
झोपेतच केली हत्या
सूत्रांच्या माहितीनुसार, बोरखेडा (Borkheda) रस्त्यावरील शेख मुस्तफा शेख यांच्या शेतात महेताब गुलाब भिलाला भिलाला हे रखवालदार म्हणून असून ते पत्नी आणि पाच मुलांसह (तीन मुले, दोन मुली) राहतात. मध्यप्रदेशात नातेवाईकांचे निधन झाल्याने पत्नी व एका मुलासह गेले असता शेत-शिवारातील घरात दोन मुले आणि दोन मुली घरी होत्या मात्र शुक्रवारी मध्यरात्री ही भावंडे झोपेत असतांनाच अज्ञातांनी कुर्हाडीने चौघ्या भावंडांची निर्घुण हत्या (hatya) केली. या घटनेने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे (dysp narendra pingale), पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे (pi ramdas wakode) घटनास्थळी धाव घेतली तर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. मृतांमध्ये सविता (14), सुमन (6) या बहिणींसह राहुल (11), अनिल (8) या भावंडांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी शेतमालक शेतात आल्यानंतर त्यांच्या नजरेस ही घटना पडताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.


