भुसावळात तापी पात्राजवळून दुचाकी लंपास


भुसावळ : तापी नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेल्या भागवत भोई यांनी नदीच्वळ लावलेली दुचाकी दोन चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला, शनिवारी दुपारी 4 ते 4.30 वाजेच्या सुमारास भागवत भोई (रा. कडू प्लॉट, भुसावळ) हे तापी नदीवर मासे पकडण्यासाठी नदीवर जाळे टाकण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांची दुचाकी (एम.एच.19 ए.यु.3948) ही राहुल नगरजवळील नीम कराडजवळ लावली होती, मात्र कोणी तरी चोरट्यांनी ही गाडी चोरून नेली. चोरी करणारे दोन संशयीत असल्याचा अंदाज भोई यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. भोई यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात दोन चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय कंखरे ुढील तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !