वरणगावचे डॉ.नि.तु.पाटील यांचा राज्यपालांनी ‘कोरोना वीर पुरस्कारा’ने केला सन्मान
भुसावळ : वरणगावचे नेत्रतज्ज्ञ तथा भाजपा वैद्यकिय आघाडीचे नाशिक विभागीय सहसंयोजक डॉ.नि.तु. पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी राजभवन, मुंबई येथे ‘कोरोना वीर सन्मान’ पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यातील जवळपास 52 वैद्यकीय आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेल्या व्यक्तींचा सामाजिक कार्याची दखल घेवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ.अजित गोपछडे, मुंबई संयोजक डॉ.स्मिता काळे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

