कुर्‍हाकाकोडा येथे प्रफुल्ल लोढा यांची प्रतिमा जाळली


माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरील बेछूट आरोपांचा निषेध

मुक्ताईनगर : जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांनी पत्रकार परीषदेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर खळबळजनक आरोप केल्याचे त्याचे भुसावळ विभागात पडसाद उमटत आहेत. बिनबुडाचे आरोप करणार्‍या जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांच्या वक्तव्याचा मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथे निषेध व्यक्त करीत त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल खोले महाराज, डॉ.बी.सी.महाजन, अवधूत भुते, प्रदीपपुरी गोसावी, प्रकाश शेठ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीस रवींद्र दांडगे, अनंत पाटील, गजानन पाटील, संदीप वाकुलकर, निंबाजी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकते उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !