येशूच्या जन्मोत्सवाने नाताळ सण उत्साहात साजरा
भुसावळ : आर्या फाऊंडेशन संचलित हिरकणी महिला मंचतर्फे मराठी अलायन्स चर्चच्या माध्यमातून अध्यन पॅरामेडीकल कॉलेजमध्ये येशूच्या जन्मोत्सवाने नाताळ सण साजरा करण्यात आला. यावेळी मराठी अलायन्स चर्चचे पास्टर स्वप्नील नाशिककर, आर्या फाऊंडेशनचे अध्यक्ष उमेंद्र वाघचौरे, चर्चचे अध्यक्ष प्रवीण ओहोळ, सेक्रेटरी फिलिफ फ्रान्सीस उपस्थित होते.
यांनी घेतले यशस्वीतेसाठी परीश्रम
यावेळी आर्या फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या विविध समाजपयोगी आर्या फाऊंडेशनच्या कार्याची माहिती प्रास्ताविकेतून डॉ.वंदना वाघचौरे यांनी दिली. सुवर्ण इंगळे यांनी चर्चच्या लहान मुलांना येशू जन्माचे गीत म्हणून कार्यक्रमाची सुरूवात केली. चर्चच्या तरुण संघाचे अध्यक्ष नवीन जाधव यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले. चर्चच्या संडे स्कूलमधील अनिता खंडाळकर, प्रतिभा वाघमारे, रीना सिंग, संगीता निर्मल यांनी नाताळनिमित्त गीत सादर केले. लहान मुलांनी येशूच्या जन्म सोहळ्याची नाटीका यावेळी सादर केली. सांताक्लॉजने लहान मुलांना विविध भेट वस्तू दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हिरकणीच्या अध्यक्षा निरंजना तायडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मोनिका डेनियल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अंजूम खान, बबिता सिंग, अॅड.मनिषा बाविस्कर, सरोजिनी रामटेके, मालती येवले यांनी परीश्रम घेतले.


