नशिराबादचा दुचाकी चोरटा बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : नशिराबाद येथील दुचाकी चोरट्यास बाजारपेठ पोलिसांनी गस्तीवर असताना अटक केली असून त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीची चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. राम मुकेश करोसिया (21, रा.भवानी नगर, नशिराबाद) असे अटकेतील आरोपीचे नाव असून आरोपी भुसावळ तालुका हद्दीतून दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आहे. आरोपीला अधिक तपासासाठी तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी निरीक्षक बाळासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोटला, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे आदींनी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !