पाणीटंचाई दूर झाल्याने पदाधिकार्यांसह अधिकार्यांचा गौरव
भुसावळ : शहरातील काझी प्लॉट भागात तीन ते चार वर्षांपासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पालिका अधिकार्यांनी नियोजन करून तो मार्गी लावला आहे. यामुळे परीसरातील नागरिकांनी पालिकेत जाऊन अधिकार्यांचा गौरव केला. या भागात पाईपलाईन नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. या प्रकरणी माहिती अधिकार समितीचे तालुकाध्यक्ष अब्दुल नाजीम अब्दुल यांनी दोन वर्षे पालिकेकडे पाठपुरावा केला. टंचाई दूर झाल्याने पाणीपुरवठा अभियंता नितीन लुंगे, सतीश देशमुख, भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचार्यांचा गौरव करण्यात आला.

