केंद्र सरकारने काळे कायदे मागे घ्यावेत
भारतीय स्त्री मुक्ती परीषदेत दहा ठराव झाले पारीत
भुसावळ : 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन जाहीर करावा, सरकारी आरोग्य सेवेत सुधारणा करावी, केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत यासह विविध मागण्यांचे दहा ठराव वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे भारतीय स्त्री मुक्ती परीषदेत पारीत करण्यात आला. जिया कॉलनी, खडका येथे नुकतेच परीषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून लता तायडे उपस्थित होत्या. भारतीय स्त्री मुक्ति परीषदेमध्ये 10 ठराव जिल्हा उपाध्यक्षा संगीता भामरे यांनी मांडले आणि जिल्हा महासचिव वंदना सोनवणे यांनी त्यास अनुमोदन दिले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे उपस्थित होते. परीषद यशस्वीतेसाठी शबनम खान, पारबता ताई, वनीता इंगळे, जयश्री नन्नवरे, शिरीन, रूबीना मुसकान शेख, नजमाबी शहेनाज, सादिया, हिना, गुडीया, फरजाना, अमरीन, जमिला, सायरा, यास्मीन, सानिया तरनुम, निलेश जाधव, फिरोज भाई, देवदत्त मकासरे यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्षा संगीता भामरे तर आभार जिल्हा महासचिव वंदना सोनवणे यांनी मानले.


