भुसावळ काँग्रेस कमिटीतर्फे पक्षाचा 136 वा वर्धापनदिन उत्साहात
भुसावळ : शहर काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस पक्षाचा 136 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माजी आमदार नीळकंठ फालक यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. भुसावळ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र निकम यांनी प्रास्तविक केले. काँगे्रस स्थापना दिनाबद्दल माजी आमदार नीळकंठ फालक, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुन्वर खान यांनी मार्गदर्शन केले.
यांचा झाला सत्कार
ज्येष्ठ कार्यकर्ते जे.बी.कोटेचा, जगपालसिंग गील, माजी आमदार नीळकंठ फालक, शहराध्यक्ष रवींद्र निकम, जिल्हाध्यक्ष मुन्वर खान, शैलेश अहिरे, विलास खरात, संतोष साळवे, सलिम गवळी, राम अवतार परदेशी आदींचा सत्कार करण्यात आला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या व त्यानंतर देशाच्या विकासाचा भक्कम पाया रचणार्या काँग्रेस पक्षाचा 28 डिसेंबर रोजी साजरा होणारा वर्धापनदिन म्हणजे कोट्यवधी कार्यकर्ते व जनतेच्या दृष्टीने ऐतिहासिक प्रेरणादिन होय. देशाच्या वाटचालीचा भक्कम पाया रचला, देशाला आत्मनिर्भर केले, त्याच बरोबर लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्मसमभाव आणि सामाजिक समता जोपासण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले, असे विचार माजी आमदार नीळकंठ फालक, शहराध्यक्ष रवींद्र निकम, जिल्हाध्यक्ष मुन्वर खान यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, महेंद्र महाले, जिल्हा अध्यक्ष असंघटीत कामगार गणेश बारसे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलीम गवळी, सरचिटणीस शैलेश अहिरे, ईसाक चौधरी, हमीद सर, शरद खराटे, जिल्हा महिला सचिव राणी खरात, यास्मीन बी., सुजाता सपकाळे, दुर्गाबाई सोनवणे, वंदना चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

