ग्रामपंचायत निवडणुकीमुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक
मुक्ताईनगर : सध्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून यंदा उमेदवारी करण्याकरीता ग्रामपंचायत येणे बाकी, शौचालय वापराबाबत दाखला, अतिक्रमीत नसल्याचा दाखला, ठेकेदार नसल्याचा दाखला, रहिवासी प्रमाण पत्र अशा ग्रामपंचायत दाखल्यांसह बँक खाते, मतदार यादी, वयाचा पुरावा, शैक्षणिक पुरावा तसेच राखीव जागेकरीता जातीचा दाखला, जात पळताळणी टोकन आदी कागदपत्रे सादर करावी लागत असल्याने त्याची जमवा-जमव करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे.
महिलांनी धरली माहेरची वाट
निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.या आरक्षणात विवाहित महिलांना माहेरचे नाव व सासरचे नाव असे हमीपत्र द्यावे लागत असून आरक्षित जागेसाठी महिलांना जात पळताळणी करतांना आजोबाचा संबंधाने जातीचा दाखला मिळत असल्याने त्यांना माहेरची वाट धरावी लागत आहे.


