भुसावळ खाटीक समाज बिरादरीतर्फे गुणवंतांचा सत्कार
भुसावळ : खाटीक समाज बिरादरीतर्फे समाजातील गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या करण्यात आला. शहरातील शाळा क्रमांक तीनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सत्कारामुळे आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्या परीवाराचा व समाजाचा विकास व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले. समाजातील हुशार विद्यार्थ्यांना अखिल भारतीय मुस्लिम खाटीक समाजातर्फे शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन मान्यवरांनी दिले.

