दुकानदार ग्राहकात हाणामारी, प्रौढ जखमी


भुसावळ : किरकोळ वादातून ग्राहकाने दुकानदाराला मारहाण केल्याची घटना शनीमंदीर वॉर्डात सोमवारी सायंकाळी घडली. नितेश हरनाम बठेजा यांच्या दुकानात सुजय महाले गेला होता. त्यामुळे किरकोळ कारणाने त्यांच्यात वाद झाला. यात महालेने बठेजा यांना मारहाण करून शिविगाळ केली. संशयीत महालेने मित्र आकाश चौधरी याला फोन करून बोलावून घेतले. चौधरीने वीट मारून फेकली, ती दीपक रामाणी यांना लागली. घटनेनंतर दोन्ही संशयीत पसार झाले. त्यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. बठेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !