धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोणाचे 60 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 55 हजार 855 वर : एकाच दिवसात 44 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे 60 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1329 रुग्णांचा मृत्यू ओढवला तर गेल्या 24 तासात एका रुग्णांचा मृत्यू वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 855 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 54 हजार 78 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर गुरुवारी एकाच दिवसात 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
गुरूवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 10
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 08
अमळनेर 03
चोपडा 17
पाचोरा 06
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 01
एरंडोल 00
जामनेर 04
रावेर 02
पारोळा 00
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 08
बोदवड 00
अन्य जिल्हा 01


