पाण्यात राजकारण न करता मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करा : भाजपा जिल्हाध्यक्ष आ राजू मामा भोळे
13 जानेवारी रोजी भाजपा तर्फे वरणगाव येथे एल्गार हंडा मोर्चा : एमजीपीकडून अहवाल मागितला ; कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही करणार जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत
वरणगाव : शहरासाठी भाजपा सरकारने 13 सप्टेंबर 2019 रोजी 25 कोटींची पाणीपुरवठा मंजूर करून केली होती. मंजुर योजनेचा पहिल्या टप्प्याचा निधी नगरपरिषदेच्या खात्यावर जमा सुद्धा आहे मात्र सरकार राजकीय आकसापोटी मंजूर पाणी योजनेचे काम सुरू करीत नाही, काम सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे , आ.संजय सावकारे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांची भेट घेण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी उपनगराध्यक्ष शेख अखलाक, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, जेष्ठ नेते मनोहर सराफ, हाजी अल्लाउद्दीन सेठ, गोलू राणे, ऍड.ए.जी. जंजाळे, अजय पाटील, संजय जैन, शामराव धनगर, माजी सरपंच सुभाष धनगर, कमलाकर मराठे, अजय जैस्वाल, शंकर पवार, किरण धुंदे , डी.के.खाटीक, पप्पू ठाकरे, जय चंदने, आकाश निमकर, जावेद शहा, ज्ञानेश्वर घाटोळे, योगेश माळी, मिलिंद भैसे, कृष्णा माळी, संदीप माळी, संदीप भोई, अरुण बावणे, हितेश चौधरी, मिलिंद भैसे, विक्की चांदेलकर, रमेश पालवे , धीरज रूनवाल अनिल वंजारी यांची उपस्थिती होती.

13 रोजी एल्गार हंडा मोर्चाचा इशारा
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांना बैठकी दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या वतीने सांगितले की, भाजपा सरकारच्या काळात मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचा पहिल्या टप्प्याचा निधी नगरपरीषदेच्या खात्यावर जमा झाला आहे, आज 8 दिवसांआड वरणगावकरांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी महिलांचे हाल होत आहे, ते हाल त्वरीत थांबले पाहिजे अजून किती सहनशीलतेच अंत तुम्ही पाहणार? जिल्हाधिकारी महोदय सहनशीलतेचा बांध जर फुटला तर परीस्थिती हाताबाहेर जाऊ शकते त्याकरीता 13 जानेवारी रोजी भाजपातर्फे पाणी योजनेचे काम सुरू करण्यासाठी एल्गार हंडा मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यापूर्वी आपण आपल्या स्थरावरून वर्क ऑर्डर द्यावी, अशी मागणी यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांच्याकडे केली.
तत्काळ पाणी योजनेचे काम सुरू करा
यावेळी आमदार संजय सावकारे यांनी सुद्धा वरणगावची पाण्यासाठी परीस्थिती हाताबाहेर जाऊ शकते यासाठी आपण तत्काळ पाणी योजनेचे काम सुरू करा, अशी मागणी आमदार संजय सावकारे यांनी केली यावेळी केली.
पाणी योजनेचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील : जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही
जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी सांगितले की, मी एमजेपी यांच्याकडून अभिप्राय मागितला आहे त्यानंतर पुढील कार्यवाही करून पाणी योजनेचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आश्वासन यावेळी भाजपाच्या शिष्टमंडळाला दिले.

