फसवणुकीच्या गुन्ह्यातील इराणी महिला पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : मुंबईतील काशी मीरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात प्रकरणी संशयित महिलेल्या भुसावळच्या पापा नगरातून अटक करण्यात आली आहे. कुब्रा मोहम्मद इराणी (रा. भिवंडी, मुंबई) असे अटकेतील महिला आरोपीची नाव आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीने हातचलाखीने दागिने लांबवले यानंतर हे दागिने पत्नीकडे सोपवल्याचा आरोप आहे.

यांनी आवळल्या आरोपी महिलेच्या मुसक्या
मुंबईतील काशी मीरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जावेद मुल्ला यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसांना संबंधित गुन्ह्याबाबत व आरोपी महिला भुसावळातील पप्पा नगरात आल्याची माहिती दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. नववर्षाच्या प्रारंभी एक रोजी आरोपी महिलेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रिया अरखराव तसेच जळगाव गुन्हे शाखेचे हवालदार कमलाकर बागुल आदींनी महिला आरोपींच्या मुसक्या आवळल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !