नवाब किंग फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त 4 रोजी रक्तदान शिबिर
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नवाब किंग फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ४ जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील मरकज मस्जिद जवळील जि.प.उर्दु शाळेच्या आवारात सकाळी १० वाजेपासून या शिबिराला सुरुवात करण्यात येणार आहे. शिबिराचे उद्घाटन मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा नजमा तडवी असतील. प्रमुख अतिथी म्हणून अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, शिवसेना अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष अफसर खान , नगरसेवक शकील सर, नगरसेवक मस्तान कुरेशी, नगरसेवक आरीफ बागवान, माजी सरपंच जफर अली, नगरसेवक नुरमोहम्मद, सलीम खान (ट्रान्सपोर्ट), आरीफ आझाद, शकील मेंबर,शकुर जमादार इ.उपस्थीत राहणार असुन जास्तीत जास्त युवकांनी या शिबिराला उपस्थित राहून राज्यात भेडसावत असलेल्या रक्ताची गरज भागविण्यासाठी रक्तदान करुन शासनास व रुग्णांना सहकार्य करावे, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष अरबाज खान इस्माईल खान, उपाध्यक्ष अल्तमस खान, सचिव इरफान मण्यार, अश्फाक बागवान, समीर मणियार यांनी केले आहे.

