महसूलने कोविड 19 व ध्वजनिधीसाठी उभारला पाच लाखांचा निधी
रावेर : रावेर तालुक्यात ४८ ग्रामपंचायत निवडणुकासाठी इच्छुकांनी उमेदवारांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अर्ज भरतांना या दरम्यान महसूल विभागाकडे कोविड १९ व ध्वजनिधीसाठी तब्बल ५ लाख ९ हजार ५०० रुपये एका आठवड्यात जमा केला आहे. देशसेवेसाठी ध्वजनिधी तर कोरोना व्हायरसच्या रुग्णासाठी कोविड निधी असा एकूण पाच लाखाच्यावर निधी संकलन करून शासनाला सहकार्य करण्याचे काम येथील निवडणूक निर्णय अधिका-यांनी केल्याने सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. कोविडसाठी 2 लाख 84 हजार 500 रुपये तर ध्वजनिधीसाठी 2 लाख 25 हजार असा एकूण 5 लाख 9 हजार 500 रुपये जमा करण्यात आले आहे. रावेर तालुक्यात निवडणुकीदरम्यान देशसेवेसाठी उमेदवारांकडून निधी संकलन केला. हा ध्वजनिधी व कोरोनाचा दंड शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. पुढेदेखील निधी संकलन असेच सुरु राहणार असल्याचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.

