एलटीटी-गाेरखपूर एक्स्प्रेस दराेडा प्रकरण : सहा आरोपींना पाेलिस काेठडी
भुसावळ : एलटीटी गाेरखपूर एक्स्प्रेसमध्ये खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी घातलेल्या दराेड्याकरणी दाखल गुन्ह्यात जीआरपी पाेलिसांनी सहा संशयीतांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस अर्थात ८ जानेवारीपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अन्य संशयीतांचा शाेध पाेलिस घेत आहेत.
विक्रेत्यांनीच केली लूट
एलटीटी-गाेरखपूर एक्स्प्रेस ही गाडी शुक्रवारी नाशिकराेड
स्थानकावर हळू झाल्यावर काेच डी-२ मध्ये काही विक्रेते चढले त्यांनी दारू पिली असून गांजा सेवन केला हाेता, अश्यातच ते खाद्य पदार्थ, खेळणीची विक्री करीत हाेते. गाडीने जळगाव स्थानक साेडल्यावर या विक्रेत्यांनी प्रवाशांना पैश्यांची मागणी करून त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील राेख रक्कम आणि माेबाईल जबरीने हिसकावून भुसावळ रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच दहा मिनिटे अगाेदर गाडी हळू झाल्यावर आऊटरला उतरून
पळून गेले. याप्रकरणी प्रवाशांनी इटारसी येथे गुन्हा दाखल केल्यावर तेथून शून्य क्रमांकाने गुन्हा भुसावळ जीआरपी पाेलिस ठाण्यात शनिवारी आल्यावर दाखल करण्यात आला. पाेलिस निरीक्षक सुरेश सरडे व त्यांच्या
सहकाऱ्यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून काही संशयीतांना चाैकशी कामी ताब्यात घेतले हाेते. या प्रकरणात सहा संशयीतांना अटक करण्यात आली तर अजूनही या प्रकरणात काही संशयीत अटक हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यांच्या आवळल्या मुसक्या
जीआरपी पाेलिसांनी जावेद्दीन शेख समशाेद्दीन शेख (२३, रा. गाैसिया नगर, भुसावळ), अबरार शेख रज्जाक शेख (२८, रा.ग्रीन पार्क, डायमंड काॅलनी, खडकाराेड, भुसावळ), माेहंमद सलीम लल्लू कुरेशी, (गाैसिया नगर, भुसावळ), अजीम शेख सलीम शेख (२६, रा.गाैसिया नगर, भुसावळ), शेख शाहरूख उर्फ साहू शेख अजगर (२४, रा. गाैसिया नगर, भुसावळ) व माेहंमद इस्त्राईल निहाल अहमद (रा.गाैसिया नगर, भुसावळ) यांना अटक केली.
यांनी केली कारवाई
एलटीटी-गाेरखपूर एक्स्प्रेसमध्ये दराेडा टाकल्याने पाेलिस यंत्रणा कामाला लागली असून पाेलिस निरीक्षक सुरेश सरडे सहायक पाेलिस निरीक्षक ईश्वर साेगे, सहा.पाेलिस निरीक्षक पौर्णिमा राखुंडे, फाैजदार साेनकांबळे, सहा.फाैजदार मधुकर न्हावकर, सहा.फाैजदार कीशाेर बढे, अजीत तडवी, धनराज लढे, महेद्र पाटील आदींनी संशयीतांचा शाेध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्यात.

