बियाणी पब्लिक स्कुलच्या प्राचार्यपदी रुद्रसेन गंठिया
भुसावळ : शहरातील रामेश्वर नगर, प्रोफेसर कॉलनीतील बियाणी पब्लिकक स्कुलच्या प्राचार्यपदी रुद्रसेन गंठिया यांची नुकतीच निवड बियाणी एज्यूकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी यांनी केली. यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, बियाणी मिलिटरी स्कुलचे प्राचार्य डी.एम.पाटील, बियाणी ग्रुपचे मॅनेजर गोपाळ ठाकूर, राजू पारीख, प्रवीण भराडीया आदी उपस्थित होते. रूद्रसेन गंठिया यांना 15 वर्षाचा शिक्षण क्षेत्राचा अनुभव असून येणाऱ्या आगामी काळात ते शिक्षण क्षेत्रातून चांगले विद्यार्थी घडवतील व यापुढे शाळेसंदर्भात कोणालाही समस्या असल्यास प्राचार्य रुद्रसेन गंठिया यांनाच संपर्क करावा, असे डॉ. संगीता बियाणी यांनी कळविले आहे.

