पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


भुसावळ : राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळतर्फे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांनती ज्योती सावित्रीआई फुले
यांची १९० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यांची कार्यक्रमाला उपस्थिती
उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, नाहटा महाविद्यालयाच्या प्राचार्य मीनाक्षी वायकोळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल शालिनी वाल्के, महिला क्रिडा मंडळ अध्यक्ष आरती चौधरी,
ॲड.कल्पना टेमाणी, महिला समुपदेशक भारती रंधे-म्हस्के, पत्रकार उज्वला बागुल यांची उपस्थिती होती. यावेळी आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष
रमेश मकासरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशीयांचीही उपस्थिती होती.


उपक्रमा अंतर्गत जमा झाले शैक्षणिक साहित्य
शाळेची बॅग- १०, दोनशे पेजेस वह्या- ८४, शंभर पेजेस वह्या- ८५, कंपास- २१, लेटरपॅड- २०, पेन- ८५, पेन्सील- ८६, शाॅपनर- ७१, रबर- ७१, स्केलपट्टी- २१, ड्राईंग कलर- ४ पाकिट, पुस्तक-२ याप्रमाणे शैक्षणिक साहित्य दात्यांनी संस्थेला दिले. चंद्रमणी सपकाळे, आरती चौधरी, शालिनी वाल्के, डॉ.निलेश महाजन, ललित मुथा,राजेंन्द्र आवटे, नरेन्द्र यादव, डॉ.सुवर्णा गाडेकर-सोनार, सारंग पाटील, सुमंगल अहिरे, राजेश चंदन, निलेश रणदिवे, संदीप पाटील, जयेंन्द्र लेकुरवाळे, सुरवाडे सर, मयुर सुरवाडे, भारती रंधे-म्हस्के, प्रकाश सोनवणे, प्रियंका शर्मा, संध्या चंदेल, प्रशांत अग्रवाल, मनोज भालेराव यांची या कामी सहकार्य लाभले.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परीश्रम
नगरपालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटनकर मॅडम यांच्या सहकार्याने आशा वर्कर सुनिता विनंते, चंद्रकला कापडे यांनी कार्यक्रमाला येणाऱ्या नागरीकांना सुरवातीला सॅनेटराईज करुन,बाॅडी टेंपरेचर व ऑक्सीजन लेवल चेक करुन फाउंडेशनच्या उपक्रमास सहकार्य केले. दरम्यान, कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे, सचिव निर्मला सुरवाडे, सुजाता सपकाळे, छाया चौधरी आदींनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !