भुसावळातील तरूणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू
भुसावळ : शहरातील दत्त नगर भागातील 30 वर्षीय तरुणाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली. विनय मनोहर जावळे (30, दत्तनगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उपस्टेशन प्रबंधक ए.आर.खरारे यांच्या खबरीनुसार शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डाउन रेल्वे लाईन खांबा क्रमांक 442/1 जवळ कुठल्यातरी धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने 30 ते 35 वर्षीय वयाच्या अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय.राजु परदेशी करीत आहेत.

