बोदवड तालुक्यात 587 उमेदवारांपैकी 142 जणांची माघार
बोदवड : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींंसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी 587 उमेदवारांपैकी 143 जणांनी माघार घेतल्याने 444 उमेदवार रींगणात आहेत. 48 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे तर भानखेड व हरणखेड ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या आहे. सकाळपासून तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.
ग्रा.पं.निहाय रिंगणातील उमेदवार असे
अर्जासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत होती व त्यानंतर चिन्हे वाटप करण्यात आले. तहसीलदार जितेंद्र कुवर, निवडणूक नायब तहसीलदार दीपक कुसकर यांनी छाननी प्रक्रियेची माहिती दिली. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्यासह निवासी नायब तहसीलदार दीपक कुसकर यांनी काम पाहिले. गावनिहाय दाखल अर्ज व अपात्र अर्जाची संख्या अशी- मनुर बु॥ 50 पैकी 19 माघार 11 जागेसाठी 31 उमेदवार रिंगणात, नांदगाव 27 पैकी 7 माघार 19 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, चिंचखेडसिम 14 पैकी 2 माघार 6 बिनविरोध तर 1 जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात, मानमोडी 21 पैकी 9 माघार 10 उमेदवार रिंगणात 1 बिनविरोध, विचवा 19 पैकी 5 माघार 14 रिंगणात, वाकी 14 पैकी 1 माघार 1 बिनविरोध 11 उमेदवार रिंगणात, शेलवड 40 पैकी 7 माघार 33 उमेदवार रिंगणात, नाडगाव 25 पैकी 1 माघार 24 रिंगणात, मनुर खु॥ 24 पैकी 10 माघार 14 रिंगणात, चिखली 21 पैकी 5 माघार 2 बिनविरोध 12 रिंगणात, मुकत्ताळ 17 पैकी 17 रिंगणात, वराड बु 15 पैकी 2 माघार 13 रिंगणात, सुरवाडे बु।.19 पैकी 6 माघार 13 रिंगणात, सुरवाडे खु॥ 16 पैकी 5 माघार 3 बिनविरोध 8 रिंगणात, लोणवाडी 20 पैकी 4 माघार 13 रिंगणात 3 बिनविरोध, जामठी 39 पैकी 10 माघार 1 बिनविरोध 27 रिंगणात, भानखेडा सर्व उमेदवार बिनविरोध, वरखेड बु।.15 पैकी 1 माघार 14 रिंगणात वरखेड खु॥19 पैकी 3 माघार 16 रिंगणात, शिरसाळा 13 पैकी 2 माघार 7 बिनविरोध 2 रिंगणात, हिंगणा 23 पैकी 8 माघार 15 रिंगणात, ऐणगाव 24 पैकी 6 माघार 17 रिंगणात 1 बिनविरोध, राजुर 12 पैकी 1 माघार 3 बिनविरोध 8 रिंगणात, साळशिंगी 22 पैकी 4 माघार 18 रिंगणात 1 बिनविरोध, हरणखेड बिनविरोध घानखेड 21 पैकी 8 माघार 13 रिंगणात, जुनोणा 21 पैकी 6 माघार 15 रिंगणात, आमदगाव 24 पैकी 10 माघार 14 रिंगणात, करंजी 12 पैकी 1 माघार 11 रिंगणात आहे.


