ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उघडले खाते
भुसावळ : तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतील वॉर्ड क्रमांक तीनमधील ड राखीवमधून लक्ष्मी सिध्दार्थ सपकाळे यांची बिनविरोध निवड झाल्याने वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायतीत चंचू प्रवेश केला आहे. सलग चार पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवार लक्ष्मी सिध्दार्थ सपकाळे यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, सिध्दार्थ सपकाळे, अरुण नरवाडे जिल्हा कोषाध्यक्ष, संतोष कोळी तालुकाध्यक्ष, बालाजी पठाडे, गणेश इंगळे तालुका सचिव, विजय मालवीय, शिवाजीराव टेंभुर्णीकर, अरुण तायडे आदींची उपस्थिती होती.


