भुसावळ कृउबात पोलिस चौकीसाठी गृहमंत्री सकारात्मक
भुसावळ कृउबा सभापती सचिन चौधरींनी अनिल देशमुख यांची घेतली भेट
भुसावळ : महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सोमवारी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांनी भेट घेतली. यावेळी भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये शेतकर्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिस चौकशी सुरू करण्याची मागणी चौधरी यांनी केली असता गृहमंत्र्यांनी मागणीसंदर्भात सकारात्मकता दर्शवल्याचे चौधरी यांनी कळवले आहे.

