यावल तालुका ग्रामपंचायत निवडणूक : 226 उमेदवारांची माघार


यावल : तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून माघारीच्या अखेरच्या दिवशी सोमवारी 226 उमेदवारांनी माघार घेतली तर 87 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 469 सदस्य निवडूण येणार असून यात चोपडा विधानसभा मतदारसंघातीत 18 ग्रामपंचायत तर रावेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 29 ग्रामपंचायतींसाठी होणार्‍या निवडणुकी एक लाख चार हजार 25 मतदार आपला हक्क बजावतील. 15 जानेवारी निवडणूक तर 18 जानेवारी मतमोजणी होणार आहे.

87 उमेदवार बिनविरोध
यावल तालुक्यात 87 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले असून सर्वाधिक बिनविरोध उमेदवार हे मारूळ ग्रामपंचायतीतून निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेली उमेदवारांमध्ये मारूळ 10, आमोदे 6, किनगाव 4, वढोदे प्रगणे यावल 6, नावरे 5, आडगाव 4, टाकरखेडा 6, मोहराळे 4, पिंप्री 4, मनवेल 3, कासवे 3, पिंपरूड 3, अंजाळे 3, बोरावल खुर्द 2, वनोली 2, अट्रावल 2, विरोदा 2, उंटावद 2, कोरपावली 1, महेलखेडी 1, चिंचोली 1, वढोदे प्र.सावदा 1, हंबड्री 1, दुसखेडा 1, कोसगाव 1, पिळोदे ग्रुप 1, निमगाव 1, कोळवद 1, नायगाव 1, बोरावल खुर्द 1 याप्रमाणे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून एकूण 905 उमेदवार हे निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांचे चिन्ह वाटप करण्यात आले असून मंगळवारपासून गावा-गावात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. संपूर्ण निवडणुक प्रक्रीया शिरपूर विभागाचे प्रांत अधिकारी व यावल तालुका निवडणुकीचे प्रमुख निरीक्षक व्ही.व्ही.बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील व 27 निवडणूक निर्णय अधिकारी यांचा यात सहभाग आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !