जबरी चोरीतील दुसरा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : स्टार लॉनजवळ मित्र-मैत्रिणी बोलत असताना चौघा संशयीतांनी त्यांना चाकू दाखवत मारहाण करून त्यांच्याजवळील सोन्याची चैन, चांदीचे दागिने व रोकड मिळून चार हजार 600 रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना 2 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सोमवारी सचिन शाम खरारे (22, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी पहाटे दुसरा संशयीत आरोपी आनंद दिनेश खरारे (18, रा.वसंत दादा नगर, वांजोळा) यास वांजोळा गावातून अटक करण्यात आली.

चाकूच्या धाकावर केली होती लूट
तक्रारदार मोहन रमेश घुले (19, रा.15 बंगला, भुसावळ) हे त्यांच्या मैत्रिणीसह 2 रोजी सायंकाळी साडेसात ते आठ दरम्यान बोलत असताना चौघा आरोपींनी त्यांना मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील चार हजार 600 रुपयांची चैन तसेच चांदीचे दागिने व रोकड लांबवली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौर, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक कृष्णा भोये, गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोंटला, एएसआय तस्लीम पठाण, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, रवींद्र तायडे आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !