भुसावळात पत्रकार, छायाचित्रकारांचा सन्मान
भुसावळ : मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भुसावळ शहरातील समाज माध्यमात उत्कृष्ट काम करणार्या पत्रकारांचा ‘उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार’ व समाजकार्य करणार्यांचा ‘विशेष पुरस्कार’ देवून बुधवार, 6 रोजी सन्मान करण्यात आला. भुसावळ पंचायत समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बुधवारी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्रा.डॉ.मधू खराटे होते.


यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवाएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, ज्येष्ठ पत्रकार नंदलाल अग्रवाल, सरकारी वकील तथा भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अॅड.नितीन खरे, भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांची उपस्थिती होती.
यांना मिळाला उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार
जनशक्तीचे उपसंपादक गणेश वाघ, उज्वला बागुल, आशिष पाटील, संतोष शेलोडे
उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्कार
शाम गोविंदा, कालु शाह, कमलेश चौधरी

