पत्रकारास मारहाण करणार्या पोलिसावर कारवाईची मागणी
भुसावळ : दीपनगरचे पत्रकार सुमित अशोक निकम यांना 31 डिसेंबर 2020 रोजी मध्यरात्री 12.30 वाजेनंतर भुसावळ-दीपनगर बायपास जवळील सटमाय माता मंदिराजवळ पोलिस कर्मचारी सुरेश महाजन व त्यांच्या सोबतच्या अनोळखी एकाने मारहाण केल्याची तक्रार निकम यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. निकम यांच्या खिश्यातील 10 हजारांची रोकड, 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व चैनमधील तीन ग्रॅम वजनाचे पदक संबंधितानी हिसकावून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तालुका पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून अद्याप जाबजवाब झाला नसल्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार म्हणाले.

