रोटरी रेलसिटीद्वारा आर्थो बँकेचे लोकार्पण
भुसावळ : रोटरी क्लब ऑफ रेलसिटी भुसावळने समाजातील गरीब, गरजू रुग्णांच्या सोयीसाठी आर्थो बँकेची निर्मिती केली आहे. या बँक अंतर्गत व्हिल चेअर- पाच, सेमी फौलर बेड पाच, एअर बेड चार, वॉटर बेड-चार, कमोड चेअर चार आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या आर्थो बँकेच्या संचलनासाठी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीकडे या बँकेचे लोकार्पण करण्यात आले. हे साहित्य 24 तास मोफत गरजू रुग्णांसाठी गुरुद्वारा, भुसावळ येथे उपलब्ध राहणार आहे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भुसावळ मिल्टी स्टेशनचे कमांडर कर्नल करुण ओहोरी, गुरुद्वारा प्रबंधक कमिटी प्रमुख बलदेवसिंग पल्ला यांना बँकेचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.निलेश महाजन, रोटरी प्रांतपाल शब्बीर शकीर, माजी प्रांतपाल राजीव शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रोटरी रेलसिटीच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले व याचा फायदा निश्चितपणे समाजाच्या तळागाळातील गरजूंकरीता करीता होईल, असा विश्वास व्यक्त केला. यशस्वीतेसाठी अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शहा, प्रकल्प प्रमुख अनिल सहानी, सहप्रकल्प प्रमुख हरविंदरसिंग थेटी व सर्व रोटरी रेल सिटीच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.


