राष्ट्रीय स्थरावरील चॅम्पियन्सशिपमध्ये गाडगेबाबा अभियांत्रिकीची तेजस्विनी द्वितीय
भुसावळ : हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी तेजस्विनी प्रमोद भालेराव हिने डी.एच.आय.इन्फोटेक व एफ.टी.पी.ओ.या नामांकित संस्थेकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अॅप्टीटूड चॅम्पियनशिपमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तिला 10 हजारांचे रोख पारितोषिकदेखील जाहीर झाले आहेत.
निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह, अकॅडमीक डीन डॉ.आर. बी. बारजिभे, डॉ. डी. डी. पाटील व सर्व शिक्षकांनी तिचे कौतुक केले. मुंबई, पुणे, कलकत्ता, नोएडा, चेन्नई व इतर राज्यातील अनेक शहरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. याच बरोबर तेजस्विनीची इंटर्नशिपसाठी निवड सुद्धा झालेली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय पालक व प्राध्यापकांना दिले आहे.


