मुक्ताईनगर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची विजयी सुरुवात
मुक्ताईनगर : तालुक्यातील चिंचोल येथील वॉर्ड एकमधून भीमराव वेडू सुरवाडे हे बिनविरोध विजयी झाल्याने जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे आणि जिल्हा महासचिव दिनेश इखारे यांनी त्यांचा गौरव करीत ग्रामस्थांचे आभार मानले. हे यश वंचित तालुका सल्लागार किशोर गुरचळ व सर्व गावकरी आणि मित्र परीवाराचे असल्याचे सोनवणे म्हणाले. भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बु.॥ वॉर्ड क्रमांक तीनमधून प्रीती सुपडू बावस्कर यांचीदेखील बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा नुकताच सत्कार वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, विद्यासागर खरात, बंटी सोनवणे, बालाजी पठाडे, देवदत्त मकासरे, अॅड.अभिजित यांनी केला

