दोन गटात पोलिस ठाण्यातच फ्री स्टाईल हाणामारी


जळगाव शहर पोलिस ठाण्यातील प्रकार : वादाची तक्रार देण्यास आल्यानंतर दोन गटात झोंबाझोंबी

जळगाव : आपसात झालेल्या वादाची तक्रार द्यायला आलेले दोन्ही गटांमध्ये पोलिस ठाण्यातच फ्री स्टाईल झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनीच फिर्यादी होऊन दोन्ही गटाच्या नाजीमखा कादीरखा पटवे (30), फरीदाबी जुबेर खान (35) दोन्ही रा.गेंदालाल मील, सिंकदर उस्मान खान (39) व शोभा मुकेश पवार (35,रा.इंद्रप्रस्थ नगर) यांच्याविरुध्द कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तक्रार द्यायला आले अन आपसात भिडले
सूत्रांच्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून मंगळवारी सायंकाळी सहायक फौजदार संगीता खांडरे या ड्युटीला होत्या. यावेळी सिंकदर खान व शोभा पवार या आपसात झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या. यावेळी ठाणे अंमलदाराजवळ गेंदालाल मीलमधील नाजीमखा कदरखा पटवे, रीजवानाबी शेख आमीर,आबेदाबी व फरीदाबी जुबेर यांनी मागील भांडणाच्या कारणावरुन आम्हाला मारहाण केली अशी तक्रार नोंदवत असतानाच हे चौघे तेथे आले व आरडाओरड करुन त्यापैकी नाजीमखा पटवे, फरीदाबी जुबेरखान यांनी सिंकदर व शोभा यांना मारहाण करायला सुरुवात केली. उपनिरीक्षक अरुण सोनार, ठाणे अंमलदार संगीता खांडरे, भूषण पाटील, संगीता इंगळे व मनीषा चव्हाण यांनी हस्तक्षेप करुन दोघं गटाचा वाद मिटविला. पोलीस ठाण्यातच झोंबाझोंबी केली म्हणून भूषण पाटील या कर्मचार्‍यार्ंच्या फिर्यादीवरुन चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !